निर्मल सीतारमण I बजेट 2020 (Photo Credits: File)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारी) 2020-21 या वर्षासाठी मोदी सरकारचे पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आर्थिक सर्वेक्षणाचा रिपोर्ट जाहीर होणार आहे. तर 2020-21 वर्षासाठी विकासदर 6 ते 6.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्यावर्षी विकास दर कमी झाल्याने एनबीएफसी संकटात आहे. मार्च तिमाहीत विकास दर 5.8  टक्के होता.

आर्थिक सर्वेक्षणानुसार आगामी आर्थिक वर्षात देशातील गुंतवणूक आणि विक्रीमध्येही वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे. तर एप्रिल 2019 मध्ये महागाई दर 3.2 टक्क्यांवरुन डिसेंबर महिन्यात 2.6 टक्के झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याचे दिसून आले. विकास दर वाढीसोबत बांधकाम क्षेत्रात गती येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा फायदा आर्थिक तुट भरुन काढण्यासाठी होणार आहे.(Economic Survey 2020: बजेटपूर्वी येणार आर्थिक सर्वेक्षण, इथे पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग)

ANI Tweet:

यंदाच्या बजेटची उल्लेखनीय बाब म्हणजे 2015-16 नंतर पहिल्यांदाच ते शनिवारी सादर करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला बजेट सादर करण्यामागील कारण म्हणजे 31 मार्च पर्यंत बजेटची प्रक्रिया पूर्ण करणे आहे. सरकारने आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यापूर्वी सेनसेक्स मध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. मुंबईतील शेअर बाजारात 30 शेअर असणारा सेनसेक्स 48.03 अंकांनी वाढून 40,961.85 वर पोहचला.