‘Looteri Dulhan’ Gang: लग्नाच्या दहाव्या दिवशीच सोनं, पैसा लंपास करून 'लुटेरू दुल्हन' गॅंगचा भाग असलेली वधू पसार; 5 जण अटकेत
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

राजकोट (Rajkot) मध्ये नववधू घरातील मौल्यवान वस्तू घेऊन लग्नानंतर दहाव्या दिवशीच पसार झाल्याची बाब समोर आली आहे. 31 वर्षीय Ajaysinh Solanki चा फेब्रुवारी महिन्यात Rinkle Pandya सोबत विवाह झाला होता. अनेक वर्ष वधूच्या शोधात असलेल्या अजयसिंह ला लाइफ पार्टनर मिळाल्याने तो आनंदात होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही. Rinkle ने घरातून पैसे, सोनं आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. दरम्यान लग्नाच्या 15 दिवसांनंतर अजयसिंह ला समजले की Rinkle म्हणून सोबत असलेली मुलगी खरी Kausar Bano Kanmi आहे. ती एका गॅंगचा भाग आहे. जी लग्नाळू मुलांना फसवते.

गीर सोमनाथ च्या लोकल क्राईम ब्रांच कडून Kausar Bano सह मुस्कान मिर्झा, शामीन अर्थात सीमा जोशी, नरसिंह वाजा आणि नागदेव हिरालाल यांना अटक केली आहे. अजयसिंह यांच्या तक्रारी नंतर 'लुटेरी दुल्हन' गॅंग पोलिसांच्या रडार वर होती. 8 मार्चला Sutrapada police स्टेशन मध्ये त्यांनी तक्रार नोंदवली. त्यांनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. नक्की वाचा: Vadhu Var Suchak Mandal Fraud: लग्नाळलेल्या 200 तरुणांची कुटुंबासह फसवणूक, वधू-वर परिचय मेळाव्यात अनेकांना धक्का .

'लुटेरू दुल्हन गॅंग' मध्ये मुस्कानचा पती रियाझ हा मास्टरमाईंड होता. वाजा, मुस्कान यांनी त्यांची नावं बदलून कोमल आणि हिरालाल केली होती. शामीन हा लग्नाळू मुलं शोधण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. त्यांच्या गॅंग मधील मुलींसोबत या मुलांचं लग्न लावण्यासाठी तो पुढाकार घेत होता. प्रभारी पोलिस निरीक्षक अरविंदसिंह जडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रियाझ टोळीतील सदस्यांचे आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला बनवायचा आणि त्यांची नावे तसेच धर्म बदलायचा."

सोळंकी हे त्यांचे पहिले लक्ष्य असल्याचा अटक आरोपींचा दावा असला तरी त्यांनी अशा अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींवर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.