Vadhu Var Suchak Mandal Fraud: लग्नाळलेल्या 200 तरुणांची कुटुंबासह फसवणूक, वधू-वर परिचय मेळाव्यात अनेकांना धक्का
Marriage | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Solapur Fraud: 'लग्नासाठी कोणी मुली देतं का... मुली..' असे म्हणत विवाहेच्छुक तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच एक मोर्चा काढला होता. त्यातून लग्नळू तरुणांची संख्या किती प्रचंड आहे हे पुढे आले होते. दरम्यान, अशाच लग्नाळू तरुणांच्या असहायतेचा क्रूर फायदा घेऊन त्यांची फसवणूक (Vadhu Var Suchak Mandal Fraud) होत असल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील बार्शी शहरातून पुढे आली आहे. भरघोस पैसे उकळून तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वधू-वर सूचक (Vadhu Var Suchak Mandal) मंडळात वधू-वर परिचयासाठी बोलावले गेले. परंतू, प्रत्यक्षात मात्र पाहण्यासाठी वधूच उपस्थित नसल्याने तरुणांचा हिरमोड झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतापलेल्या तरुणांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये वधूवर चालक आणि एजंट विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वधवूर मंडळ चालक महिला आणि एका एजंटला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादींनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी शहरात असलेल्या एका कार्यालयात वधू-वर आणि पालक परीचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. वधू-वर मेळाव्यात वधू पाहायला मिळणार.. बोलाचाली आणि स्वभाव.. गुण जुळले तर लग्नाचीही बोलणी पुढे सरकणार या कल्पनेनेच शहारलेले हे तरुण मोठ्या संख्येने वधू-वर मेळाव्यासाठी जमले. सोबत पालकही होते. महत्त्वाचे म्हणजे वधू-वर मेळाव्यासाठी नोंदणी करण्यासाठी आगाऊ आर्थिक रक्कमही मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. (हेही वाचा, Daughter-In-Law's Second Marriage: विधवा सुनेचे सासूकडून कन्यादान, पुणे येथील सकारात्मक घटना)

दरम्यान, मोठ्याआशेने आलेल्या तरुणांना मंगल कार्यालयात वर दिसले परंतू, वधू मात्र पाहायला मिळालीच नाही. शिवाय उपस्थितांमध्ये परस्परांमध्ये झालेल्या चर्चेतून निष्पन्न झाले की, उपस्थित असलेल्या जवळपास सर्वांकडूनच वधू मिळवून देतो किंवा वधू दाखवतो या आमिषाने नोंदणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांकडूनच संताप व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या बाजूला अतिशय संतप्त झालेल्या काही मंडळींनी एकत्र येत वधू-वर मंडळ चालक आणि एजंट विरोधात पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. प्राप्त फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वध-वर मंडळ चालक आणि एजंटला ताब्यात घेतले आहे.

धक्कादायक म्हणजे वधू-वर मेळाव्यात मुलगी पसंत पडल्यास तथेच लग्न लावून दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी नोंदणी म्हणून वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी रक्कम घेण्यात आली होती. त्याचा आकडा 3 हजार ते 10 हजार इतका आहे.