BPCL आणि HPCL चे कर्मचारी सरकारच्या विरोधात 28 नोव्हेंबरला देणार संपाची हाक
प्रतिकात्मक फोटो| (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे 22 हजार कर्मचारी पुढील सहा दिवसात संपाची हाक देणार आहेत. केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या खासगीकरणामुळे कर्मचारी संघटना एकत्रित करण्यात आली आहे. या कर्मचारी युनियने 28 नोव्हेंबरला संप पुकारणार असून त्याबाबत नोटिस सुद्धा दिली आहे.

पेट्रोलियम एप्लाइज युनियनचे जनरल सेक्रेटरी बृजमोहन यांनी असे म्हटले की, बीपीसीएल यांच्यासोबत एचपीसीएलचे कर्मचारी संपाची हाक देणार आहेत. हा संप बीपीसीएलच्या केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या निर्णयाला विरोधात करणार आहेत. यामध्ये सर्व रिफायनरी डेपो आणि बॉटलिंग प्लांटचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.(सरकारी पेन्शन धारकांनो! आता घरबसल्या jeevanpramaan.gov.in वर सादर करू शकाल Digital Life Certificate)

बृजमोहन यांनी पुढे असे म्हटले, जवळजवळ 10 कर्मचाऱ्यांच्या संघटना 28 नोव्हेंबरला संपाची हाक देणार आहेत. त्याअंतर्गत बीपीसीएल आणि एचपीसीएलचे 22 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यानंतर पुढील रणनिती आखण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा संप हा केंद्र सरकारच्या विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल आहे. दरम्यान केंद्रीय कॅबिनेटने बीपीसीएल मध्ये सरकारी हिस्सा विकण्यासाठी मंजूरी दिली आहे. याच कारणामुळे कर्मचारी संपाची हाक देणार आहेत.

तर ऑक्टोबर महिन्यात  अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ यांनी 22 ऑक्टोबरला संपाची हाक दिली होती. या प्रकरणाला भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस यांनी सुद्धा समर्थन दिले. ही संपाची हाक 10 बँकांच्या विलिनिकरणाच्या विरोधात देण्यात येणार आली होती. बँकांच्या विलिनिकरणानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येणार आहेत.  आंध्रा बँक, इलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायडेट बँक ऑफ इंडिया आणि ओरियंएटल बँक ऑफ कॉमर्स यांचे अस्तित्व संपणार आहे.