FM निर्मला सीतारमण यांच्या आर्थिक क्षेत्रातील घोषणांचं मुंबई शेअर बाजाराकडून  स्वागत; सेन्सेक्स, निफ्टी तेजीत
Photo Credits: ANI/Wikimedi Commons

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असल्याने महत्त्वाच्या अनेक बाजारपेठांमध्ये व्यवहार ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेसह मुंबई शेअर बाजारावरही पहायला मिळाला. मात्र आज (24 मार्च) काही वेळापूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ITR पासून अनेक आर्थिक उलाढालींच्या बाबत डेडलाईन्स वाढवल्याने मुंबई शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेन्सेक्स 1183.74 अंकांनी वधारून 27,164.98 पर्यंत पोहचला तर निफ्टीत देखील तेजी पहायला मिळाली. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर त्यामध्ये 314.55 अंकांनी उसळी आल्याने ती देखील 7,924.80 पर्यंत पोहचली. दरम्यान काल सोमवार, 23 मार्चला मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पहायला मिळाली होती. बाजार उघडताच लोअर सर्किट लागल्याने सुमारे 45 मिनिटं व्यवहार बंद करण्यात आला होता.

दरम्यान आज मुंबई शेअर बाजरात सकाळी प्री ओपन आणि सुरूवातीच्या व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या निशाण्यांवर पाहून अनेक गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. अर्थमंत्र्यांनी नुकतीच पत्रकार 30 जूनपर्यंत आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ दिली. विवाद ये विश्वास’ या योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच उशीरा रिटर्न फाईल करणार्‍यांसाठी व्याज 12 ऐवजी9% इतके जाहीर करण्यात आले आहे. Coronavirus: आयकर परतावा, आधार-पॅन लिंक करण्यास केंद्राकडून 30 जून पर्यंत मुदतवाढ, अडचणीत सापडलेल्या उद्योगासाठी पॅकेज जाहीर करणार: निर्मला सीतारमण

ANI Tweet

दरम्यान करोनाच्या संकटामुळे पंतप्रधान आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात इतपत चर्चा रंगल्या होत्या मात्र त्या अफवा असून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केलं जाणार आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात सातत्याने मोठी पडझड पहायला मिळाली होती. मात्र आता हे हळूहळू परिस्थिती सकारात्मकतेच्या दिशेने बदलत असल्याचं पहायला मिळालं आहे.