गिधाड (Vulture) हा पक्षी जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे पक्षी निरीक्षक पाठिमागील अनेक वर्षे सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे आहेत ती गिधाडे वाचविण्याचे मोठेच आव्हान निसर्गप्रेमींसमोर आहे. दरम्यान, गुरुग्राम (Gurugra) येथील पाणथळ प्रदेशात मात्र एक वेगळेच गिधाड (Black Vulture) पाहायला मिळाले आहे. हे गिधाड पूर्णपणे काळे आहे. काळे गिधाड दिसल्याची नोंद प्रथमच होत असल्याने पक्षीनिरीक्षकही काहीसे हैराण झाले आहेत.
काळे गिधाड हा पक्षी भारतात आढळत नाही. त्यासोबतच तो अशिया किंवा युरोप खंडातील इतर ही देशांमध्ये कुठे आढळत नाही. त्यामुळे या पक्षाला आता दुर्मिळातील दुर्मिळ पक्षी म्हणून संबोधले जात आहे. या पक्षाला अमेरिकन काळे गिधाड म्हणूनही ओळखले जाते, अशा पक्ष्यांची श्रेणी सामान्यतः ईशान्य अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेतील पेरू, मध्य चिली, ब्राझील आणि उरुग्वेपर्यंत पसरते. (हेही वाचा,Birds Death Rate Increased in Maharashtra: आगोदर कोंबड्या आणि आता कावळे, बगळे, गिधाडे, पोपट; राज्यात पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले )
ट्विट
Black vulture. My lifer. शायद भारत में पहला ही देखा गया है @WildlifeMag @wti_org_india @wii_india @WCT_India @World_Wildlife @AWF_Official @wildwarriors @WildlifeTrusts @pcmeenaIAS @subhashbrala @CornellBirds @birdsofpreywb pic.twitter.com/zzVtR1LSwr
— anil gandass (@anilgandass9) January 28, 2023
पक्षीनिरीक्षक अनिल गंडास यांनी एनडीटीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतातील अशा प्रकारचे पक्षी पाहायला मिळण्याची बहुधा पहिलीच घटना आहे. दरम्यान, काळ्या गिधाडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. दुर्मिळ गिधाड प्रथम एव्हीयन उत्साही अनुराधा माथूर यांनी पाहिले ज्यांनी पक्ष्याची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली. ट्विटरवर #Delhi #NCR वापरत त्यांनीव ट्वटिर पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिल्ली एनसीआरमध्ये ब्लॅकव्हल्चरचे दर्शन!