JP Nadda Gets Extension For BJP Chief: जेपी नड्डा यांना भाजप पक्षाध्यक्ष पदासाठी जून 2024 पर्यंत मुदतवाढ, अमित शाह यांची माहिती
JP Nadda (Photo Credits: jagatprakashnadda.in)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. जेपी नड्डा आता जून 2024 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष पदावर कायम (JP Nadda Gets Extension For BJP Chief) राहणार आहेत. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सलग दुसऱ्या दिवशी पार पडली. या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.

विद्यमान वर्षात (2023) नऊ राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूका आणि तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक 2024 पाहता संघटनात्मक बदल करण्यास भाजपचे केंद्रीय नेतृत्व फारसे अनुकुलता दर्शवणार नाही, अशीच चिन्हे होते. त्यामुळे जेपी नड्डा यांनाच मुदतवाढ मिळेल असे अपेक्षीत होते. त्यानुसार नड्डा यांना मुदतवाढ मिळाल्याचे मानले जात आहे. (हेही वाचा, Election 2024: जेपी नड्डा आणि अमित शाह 2023 मध्ये महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांना भेट देणार, जाणुन घ्या कारण)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुका 2019 पेक्षा मोठ्या जनादेशाने जिंकेल, असे अमित शाह म्हणाले.

पाटणा, बिहार येथे जन्मलेल्या नड्डा यांचे मूळ हिमाचल प्रदेशात आहे. भाजपचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. 1993 मध्ये ते बिलासपूरमधून पहिल्यांदा हिमाचल प्रदेश विधानसभेवर निवडून आले आणि 1998 मध्ये पुन्हा विजयी झाले. प्रेमकुमार धुमाळ यांच्या मंत्रिमंडळात 2008 ते 2010 पर्यंत त्यांनी वन, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

ट्विट

दरम्यान, 2012 मध्ये, नड्डा हिमाचलमधून राज्यसभेवर निवडून आले आणि 2014 मध्ये आरोग्य मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समाविष्ट करण्यात आला. ते केंद्रीय गृहमंत्रीसुद्धा राहिले. मात्र, भाजपच्या एक-व्यक्ती-एक पदाच्या नियमानुसार त्यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार सोडल्यानंतर त्यांची जागा अमित शहा यांनी घेतली. त्याच वेळी जेपी नड्डा भाजप अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.