भारतीय जनता पक्ष (BJP) अध्यक्ष, जेपी नड्डा (JP Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) 2023 मध्ये महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांना (Lok Sabha constituencies) भेट देतील. या दोघांची नजर सध्या इतर राजकीय पक्षांचे खासदार असलेल्या मतदारसंघांकडे आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पक्षाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने मोहिमेची सुरुवात सोमवारी चंद्रपूर आणि औरंगाबाद येथून होणार आहे. भाजपने भारतातील 144 लोकसभा मतदारसंघ ओळखले आहेत. ज्यात सध्या इतर पक्षांचे खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. या 144 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघ महाराष्ट्रातील आहेत.
तथापि, सर्व मतदारसंघ शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) किंवा AIMIM सारख्या प्रतिस्पर्धी पक्षांचे नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना (BSS) यांचेही आहेत. बारामती, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, बुलढाणा, कल्याण, पालघर, शिरूर, रायगड, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, वायव्य, शिर्डी, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, माढा आणि उस्मानाबाद हे मतदारसंघ केंद्राने लक्ष्य केले आहेत.
AIMIM चे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, कोणीही भारतात कुठेही प्रवास करू शकतो. परंतु, औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचारात भाजपही तितकाच भागीदार असल्याचे आता औरंगाबादच्या जनतेला कळले आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून सुमारे 30 वर्षे महापालिकेत सत्तेचा वापर करून शहराची लूट केली. त्यामुळे जेपी नड्डा यांना औरंगाबादला येऊ द्या पण ते त्यांच्या ध्येयात यशस्वी होणार नाहीत. हेही वाचा Game of Throne In 2023: लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी 2023 मध्ये रंगणार राजकीय आखाडा, कसा रंगेल निवडणुकांचा खेळ?
नड्डा सकाळी चंद्रपूरला भेट देतील आणि संध्याकाळी औरंगाबादला येतील. प्रथम ते गृष्णेश्वर मंदिराला भेट देतील आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. त्यानंतर ते कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनुक्रमे बारामती आणि कल्याणला भेट दिली.