Sunny Deol (Photo Credits: ANI)

'ढाई किलो का हाथ' यांसारखे अनेक दमदार डायलॉग्स, जबरदस्त अॅक्शन सीन्स ने प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेले अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होऊन खासदारही झाले. त्यानंतर चित्रपटांपासून थोडे दूर गेलेल्या सनी देओल यांनी एका महाविद्यालयात जाणून विद्यार्थ्यांसोबत धमालमस्ती करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. भाजप खासदार झाल्यानंतर पंजाबच्या RR Bawa DAV महाविद्यालयात प्रमुख पाहुणे गेले असता त्यांनी तेथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत आपला गाजलेला चित्रपट 'गदर' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. तसेच आपले प्रसिद्ध चित्रपटातील गाजलेले डायलॉग्सही सादर केले.

खासदार झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता सनी देओल पंजाबमधील आर आर बावा डीएव्ही महाविद्यालयात गेले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना त्यांच्या गाण्यावर नृत्य करण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव सनी देओल यांनी तेथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत धमाकेदार डान्स केला. 'दामिनी' चित्रपटातील 2 प्रसिद्ध डायलॉग्सही सादर केले.

पाहा हा धमाल व्हिडिओ:

हेदेखील वाचा- हेमा मालिनी, सनी देओल यांच्या विजयानंतर धमेंद्र आणि ईशा देओल यांचे शुभेच्छा देणारे खास ट्विट

राजकारणात आल्या कारणाने रुपेरी पडद्यापासून थोडे दूर गेलेले सनी देओल यांनी या महाविद्यालयात जाऊन खूपच धमाल केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सनी देओल यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते. सनी देओल आता भाजपकडून गुरदासपूर, पंजाब येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून गुरप्रीत सिंह पलहेरी यांची नियुक्ती केली होती. परंतु, याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला होता.