BJP leader shoots wife and 3 children (फोटो सौजन्य - X/@SupriyaShrinate)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये भाजप नेत्याने आपल्या तीन निष्पाप मुलांवर आणि पत्नीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची बारकाईने तपासणी करत आहेत. मारेकरी वडील भाजप नेते आणि पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे गंगोह परिसरातील संगाठेडा गावात घडली, जिथे भाजप नेते योगेश रोहिला यांनी शनिवारी दुपारी त्यांची पत्नी नेहा आणि तीन मुले - 11 वर्षांची मुलगी श्रद्धा, 6 वर्षांचा मुलगा शिवांश आणि 4 वर्षांचा मुलगा देवांश यांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर सर्वजण जमिनीवर पडले. गोळ्यांचा आवाज आणि आरडाओरड यामुळे गावात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच गंगोह पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी वडिलांना शस्त्रासह अटक केली. (हेही वाचा -US Woman Shoots Uber Driver: अपहरण समजून महिलेने उबेर चालकावर झाडल्या गोळ्या, हत्येचा गुन्हा दाखल)

पोलिसांनी कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना तात्काळ गंगोह सीएचसीमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांनी 11 वर्षीय श्रद्धाला मृत घोषित केले आणि इतर सर्वांची प्रकृती गंभीर पाहून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान 4 वर्षांचा निष्पाप देवांश आणि 6 वर्षांचा शिवांश यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांची पत्नी नेहा यांची प्रकृती चिंताजनक असून तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा, South Africa Firing: डर्बन येथील वसतिगृहात बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार, तर 2 जण जखमी)

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या -

या घटनेबाबत माहिती देताना एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, आरोपी योगेश रोहिला याने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली तसेच आपल्या गुन्हाची कबूली देखील दिली. परवानाधारक पिस्तूलसह ताब्यात घेतलेल्या आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेक वाद झाले होते. आज पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्या.