भाजप नगरसेवक मनोहर शेट्टी पावसाचे तुंबलेले पाणी उपसून काढण्यासाठी उतरले गटारात, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव (See Photos)
Manohar Shetty (Photo Credits: Twitter)

कर्नाटक (Karnatak) मधील मंगळुरु (Mangalore) येथे कार्यतत्पर नगरसेवक मनोहर शेट्टी (Manohar Shetty)  हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे (BJP) हे पहिल्यांदाच झालेले नगरसेवक शेट्टी हे आज आपल्या वार्डात पावसाचे तुंबलेले पाणी उपसून काढण्यासाठी चक्क गटारात उतरले होते. स्वतः गटारात उतरून स्वच्छता करणाऱ्या शेट्टी यांचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, अनेकांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळूर येथील मनोहर शेट्टी असे यांच्या वार्डात वादळी पावसानंतर पाणी साचले होते. गटारात कचरा जमा झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. वाहतुक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांनाच याचा त्रास होत होता, यानंतर शेट्टी यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले मात्र पावसाळ्यात गटारात जाणे जमणार नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशावेळी सर्वांचा त्रास लक्षात घेता मनोहर शेट्टी स्वतःच गटारात उतरले होते. Monsoon Updates 2020: भारताच्या उत्तर, मध्य, ईशान्य भागात 25 ते 28 जून दरम्यान कसा असेल मान्सूनचा प्रवास; पहा IMD चा अंदाज

मनोहर शेट्टी यांनी या प्रसंगाविषयी सांगितले की, "मी जेट ऑपरेटरला गटार साफ करण्यासाठी सांगितले. पण, त्यांनी नकार दिला. या कर्मचाऱ्यांनी मशीनच्या साहाय्याने सुद्धा पाणी उपसण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही यशस्वी झाले नाही. शेवट मी आणि माझ्या पक्षाचे अन्य चार कार्यकर्ते आम्हीच गटार स्वच्छ केले.

पहा ट्विट

दरम्यान, हे सर्व फोटो व्हायरल झाल्यावर मनोहर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना,"हा प्रकार प्रसिद्धीसाठी केलाय असे अनेकांना वाटू शकते, मात्र हे माझे कर्तव्य होते जे मी पार पाडले त्यासाठी कोणी कौतुक केले नाही तरी चालेल" अशा शब्दात उत्तर दिले आहे.