Bitcoin Crisis in 2022:  क्रिप्टोकरन्सी क्रॅश होण्याची शक्यता, अभ्यासकांनी दिले बाहेर पडण्याचे संकेत
Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

जगभरातील आर्थविश्वाचे लक्ष लागून असलेली क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉईन (Bitcoin) यांदा 100,000 डॉलरचा चा टप्पा गाठू शकेल असा अंदाज वर्तवला जातो आहे. बाजारातील चढ उतारांची शक्यता पाहता बिटकॉईनमध्ये काहीशी घसरण (Bitcoin Crisis in 2022) पाहायला मिळू शकते. पुढच्या वर्षी डिजिटल मुद्रांसाठी आणखी एक रोलर कोस्टर काळ पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. ज्यात काही क्रिप्टोकरन्सी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. काही मात्र, फारच सुमार कामगिरी करतील, असे अभ्यासक सांगतात. गोल्डमन सॅक्सने असे म्हटले आहे की, यादाच्या वर्षी बिटकॉईनचा बाजारातील हिस्सा हा सोन्यापेक्षा अधिक होईल. एका अभ्यासानुसार, बिटकॉईनची बाजारातील भागीदारी ही 50% पेक्षा अधिक होऊ शकते. ज्याचा भाव एक लाख डॉलर (74.34 लाख रुपये) पेक्षाही अधिक असू शकेल.

वॉल स्टीट बँकेच्या अभ्यसकांचा तर्क आहे की, बिटकॉईनचे बाजारातील भांडवल केवळ 700 अरब डॉलरनी कमी आहे. बँकेने म्हटले आहे की, बिटकॉईनच्या एकूण निर्मितीत घट होऊ शकते. मात्र, त्याच्या मागणीत कोणतीही घट होण्याची शक्यता नाही. बिटकॉईन सध्यास्थितीत 46,000 डॉलरवर बाजारात कामगिरी करत आहे. जी पाठिमागच्या वर्षी 69,000 इतकी होती. (हेही वाचा, Cryptocurrency: क्लाऊड टेक्नोलॉजीमुळे WazirX ची उलाढाल 10 पटींनी वाढली- निश्चल शेट्टी)

ससेक्स विद्यापीठातील प्रोफेसर कॅरल अलेक्झांडर यांच्या मतानुसार, 2022 मध्ये बिटकॉईन कदाचित क्षतिग्रस्त होईल. सीएनबीसीसोबत बोलताना पाठिमागच्या महिन्यात ते म्हणाले होते की, जर आणखी एक गुंतवणूक होते तर मी बीटकॉईनमधून बाहेर पडेल. कारण पुढच्या वर्षी कदाचित त्याची किंमत अघदीच कमी होईल. अलेक्झांडर म्हणतात, बिटकॉईनला कोणतेही मौल्यवान मुल्य नाही. ती एक गुंतवणुकीत खेळण्याची पद्धत आहे.

पाठीमागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात (2021) बिटकॉईन सुमारे 69,000 डॉलर (21.29 लाख रुपये) इतक्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. दरम्यान, त्याच्याच पुढच्या महिन्यात बिटकॉईन मोठ्या प्रमाणावर घसरताना पाहायला मिळाला. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसत आहे.