बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे (Shivdeep Lande) यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमध्ये शिवदीप लांडे यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहले आहे की. माझ्या प्रिय बिहार,
गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. (हेही वाचा - Bihar: बिहार येथील नावादयात गोळीबार करून दलितांची 80 घरे जाळली, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात )
आज मी भारतीय पोलीस सेवेचा (IPS) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील.
जय हिंद.
पाहा शिवदिप लांडे यांची पोस्ट -
बिहार कैडर के IPS अधिकारी सुपरकाॅप शिवदीप लांडे ने IPS से दिया इस्तीफा
महाराष्ट्र के मूल निवासी लांडे ने भविष्य में बिहार को ही कर्मभूमि बनाए रखने के वादे के साथ भविष्य के लिए अनेक संभावनाए खुला रखा हैं।
आपको क्या लगता है बिहार की राजनीति में प्रवेश करेंगे क्या? अगर करते हैं… pic.twitter.com/Y5v3VAUQnk
— Thakur Divya Prakash (@Divyaprakas8) September 19, 2024
बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले असल्याने ते सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवदीप लांडे हे मध्यतरी महाराष्ट्र पोलीस सेवेतही कार्यरत होते. नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी केली आहे. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते.