EC Press cpnference (Photo Credits: Twitter)

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष विहार विधानसभा निवडणुकांच्या (Bihar Assembly Elections 2020) रिझल्ट्सकडे लागले आहे. राज्यात मतमोजणी सुरु असून आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांच्यानुसार एनडीए (NDA) आघाडीवर आहे. आता बिहार निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की बिहारमध्ये सातत्याने मतमोजणी केली जात आहे आणि राउंडवार निकाल जाहीर केले जात आहेत. आज दुपारी दीड वाजेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मते मोजली गेली आहेत व अजूनही 4 कोटींपेक्षा जास्त मतमोजणी बाकी आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर केले जाऊ शकतील.

कोरोना विषाणू संकटामुळे मतमोजणी बूथची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच सभागृहात कमी टेबलवर ही मोजणी चालू आहे. यावेळी 19 ते 51 फेऱ्यांपर्यंत मतांची मोजणी होणार आहे. ईव्हीएमबाबत उद्भवणार्‍या प्रश्नांवर निवडणूक आयोगाने सांगितले की, ईव्हीएम पूर्णपणे बरोबर आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानेही याला मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाने ईव्हीएमवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त गुजरातमधील आठ, झारखंडमधील दोन आणि हरियाणा आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागेसाठी मतमोजणी सुरू आहे.

कोरोनामुळे, मतदान केंद्रांची संख्या अधिक होती ज्यासाठी 1.25 लाख ईव्हीएम मशीन्स वापरली गेली. आयोगाने सांगितले की मतांची मोजणी वेगाने चालू आहे परंतु ईव्हीएमची संख्या वाढली आहे. 2015 च्या तुलनेत बर्‍याच गोष्टी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ मतदान केंद्रे, मतपत्रिका. त्यामुळे नोकाल हाती येण्यासाठी वेळ लागू शकतो. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यावेळी एकूण 4.10 कोटी मते पडली. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मते मोजली गेली आहेत. (हेही वाचा:चिराग पासवान यांनी तहात कमावले, लढाईत गमावले? 'किंगमेकर' हा केवळ कल्पनेचा मनोरा? Bihar Assembly Election Result 2020 प्राथमिक कल काय सागतोय पाहा)

दुपारी 1.15 वाजेपर्यंत राज्यात भाजपा 74 जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे असे दिसत आहे. एनडीएचा भाग असलेले जेडीयू 48 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, महागठबंधननेही ट्रेंडमध्ये 100 सीट्सचा टप्पा ओलांडला आहे. आरजेडी 66 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने 21 जागांवर आघाडी घेतली आहे तर डावे पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये यावेळी कोणाचे सरकार स्थापन होईल हे लवकरच कळेल.