राजकारणात सक्रीय असले तरी प्रसारमाध्यमं आणि इतर राजकीय पक्षांच्या स्पर्धेत काहीसे बाजूलाच पडलेले डावे पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत ( (Bihar Assembly Election) उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election Result 2020) मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले कल पाहता कमाल 19 जागांपर्यंत डाव्या पक्षांनी आघाडी घेतली आहे. सीपीआय ( CPI (M)) , सीपीएम (CPI (M) ) आणि सीपीआयमाले (CPI(ML)) या डाव्या पक्षांनी दाखवलेलेी एकजूट कामी आल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत डावे पक्ष कमाल 19 आणि किमान 11 जागांवर आघाडीवर राहिले आहेत. डावे पक्ष एनडीएला चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2020 मध्ये दर्शवलेल्या अंदाजांमध्येही डाव्या पक्षांना 12 ते 16 जागा मिळतील असे म्हटले होते. एक्झीट पोल्सनी डाव्या पक्षांसोबत वर्तवलेला अंदाज सध्यातरी प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. केडरबेस पार्टी असलेल्या डाव्या पक्षांनी अत्यंत घट्ट अशी एकजूट दाखवली आहे. त्याचा परीणाम म्हणून डावे पक्ष चांगल्या प्रकारे कामगिरी करताना दिसत आहेत.
महागठबंधनचा एक घठक असलेल्या डाव्या पक्षांबाबत बोलाचे तर डाव्यांमध्येही भाकपा माले अधिक मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. बिहारमधील इतर डाव्या पक्षांच्या तुलनेत भाकप माले अधिक मजबूत पक्ष ठरताना दिसतो आहे. तुलनत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) काहीसा कमजोर पडताना दिसत आहे. (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी तहात कमावले, लढाईत गमावले? 'किंगमेकर' हा केवळ कल्पनेचा मनोरा? Bihar Assembly Election Result 2020 प्राथमिक कल काय सांगतोय पाहा)
महागठबंधनमध्ये झालेल्या जागावाटपात डाव्या पक्षांच्या वाट्याला 29 जागा आल्या होत्या. त्यापैकी भाकपा माले 19, भाकपा 6 आणि माकपा 4 जागा लढवत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 19 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. बिहार विधानसभा निवडणूक 2015 मध्ये भाकपा माले केवळ 3 जागा जिंकू शकला होता. तर इतर कोणत्याच डाव्या पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. भाकपा माले (03) वगळता इतर पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती.
कन्हैया कुमार याचा प्रभाव
डाव्या पक्षांनी भाकपाचा युवा नेता कन्हैय्या कुमार याला आपला स्टार प्रचारक बनवले होते. तसेच, डाव्या पक्षांनी आपली मतं विभागली जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली. जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता राहिलेल्या कन्हैय्या कुमार याने डाव्या पक्षांसाठी अनेक सभा घेतल्या.