बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या पहिल्या टप्प्यातील मतदानास काहीच दिवश बाकी असताना भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री ((Deputy CM Of Bihar) आणि भाजपचे नेते सुशील मोदी (Sushil Kumar Modi) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला बसलेला हा दुसरा धक्का आहे. भाजपचे स्टार प्रचारक शहानवाज हुसैन यांची कोरोना व्हायरस चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर सुशील मोदी यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मोदी यांना पाटना एथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोदी यांनी कोरोना झाल्याची माहिती ट्विट करुन स्वत: दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विट करुन माहिती देत सांगितले आहे की, 'माझी कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मला लक्षणे दिसू लागल्याने मी चाचणी करुन घेतली असता ती पॉझिटीव्ह आली. माझी प्रकृती उत्तम आहे. गेल्या काही काळात शरीराचे तापमान वाढले होते. सध्या मी पटना येथील एम्स रुग्णालयात दाखल झालो आहेत. उपचार सुरु आहेत. फफ्फुसाची तपासणी केली असता कोणताही धोका नसल्याचे सिद्ध झाले. लवकरच निवडणूक प्रचारास येईन'.
सुशील कुमार मोदी यांच्या आधी बुधवारी रात्री भाजपचे स्टार प्रचारक सैयद शाहनवाज हुसैन यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. शहानवाज हुसैंन यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर राजीव प्रताप रुडी, सुशील मोदी आणि मंगल पांडेय यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यानंतर आता सुशील मोदी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहारवासियांना कोरोना लस मोफत देण्याच्या भाजपच्या अश्वासनाचा शिवसेनेकडून समाचार; विचारला नेमका प्रश्न)
Tested positive for CORONA.All parameters perfectly normal.Started with mild https://t.co/cTwCzt88DL temp.for last 2 days.Admitted to AIIMS Patna for better monitoring.CT scan of lungs normal.Will be back soon for campaigning.
— Sushil Kumar Modi (@SushilModi) October 22, 2020
बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबरला 71 मतदारसंघात , दुसऱ्या टप्प्यासाठी 3 नोव्हेंबरला 94 मतदारसंघात आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला 78 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सर्व टप्प्यांची एकत्रच म्हणजे 10 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.