बिहार (Bihar) येथे सोमवारी (25 मार्च) ट्रक आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाटणा येथे ट्रक आणि रिक्षा यांच्यामध्ये धडक होऊन ही दुर्घटना घडली आहे. तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून या अपघाताचा अधिक तापस केला जात आहे.
ANI ट्वीट:
Bihar: 4 people dead, 13 injured in collision between a truck and an auto in Barh-Bakhtiyarpur police station limits, in Patna district pic.twitter.com/qkFI33ncE5
— ANI (@ANI) March 25, 2019
तर बाढ-बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अघपात झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच अपघातातील व्यक्तींची ओळख पोलिसांकडून पटवली जात आहे.