Pahalgam Terror Attack (प्रतिकात्मक प्रतिमा)

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मुख्य आरोपी आदिल अहमद ठोकरबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. आदिल अहमद ठोकर (Adil Ahmad Thokar) 2018 मध्ये विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडाचा तो सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. आदिल अहमद ठोकर हा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील गुर्रे गावचा रहिवासी आहे. ठोकर हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित आहे, ही संघटना जम्मू आणि काश्मीर प्रदेशात दहशतवादी कारवायांसाठी ओळखली जाते.

लष्कर-ए-तैयबाकडून घेतले निमलष्करी प्रशिक्षण -

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आदिल अहमद ठोकर 2018 मध्ये काश्मीरमधील गुर्रे गावातले आपले घर सोडून विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. गुप्तचर अहवालांनुसार, ठोकर पाकिस्तानला जाण्यापूर्वीच कट्टरपंथी झाला होता आणि त्याचे सीमेपलीकडे कार्यरत असलेल्या बंदी घातलेल्या दहशतवादी गटांशी संबंध होते. जम्मू-काश्मीरमधील आदिल अहमद ठोकर याने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) कडून निमलष्करी प्रशिक्षण घेतले. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या 'निष्पक्ष' चौकशीसाठी पाकिस्तान तयार; घाबरगुंडी उडालेल्या शाहबाज शरीफ यांचे महत्त्वाचे विधान)

दरम्यान, ठोकरने ऑक्टोबर 2024 मध्ये धोकादायक पूंछ-राजौरी सेक्टरमधून नियंत्रण रेषा (LOC) ओलांडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 नंतर, ठोकरचे लष्करशी असलेले संबंध अधिक घट्ट झाले आणि त्याने 22 एप्रिल 2024 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली.