Gautam Navlakha (Photo Credits: wikimedia)

एल्गार परिषद आणि भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले आरोपी आणि कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिल्लीहून मुंबईला हलवण्यात घाई करण्यात आल्याचं सांगत याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने National Investigation Agency ला प्रश्न विचारला आहे. दरम्यान 22 जून पर्यंत गौतम नवलखा यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. न्यायामूर्ती अनुप भंभानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने तिहार जेलमध्ये बंद नवलखा यांना मुंबईमध्ये घेऊन जाताना घाई केली. अजूनही या प्रकरणी तपास सुरू आहे.

न्यायालयाने 22 मे दिवशी 67 वर्षीय नवलखा यांच्या याचिकेवर NIA कडून उत्तर मागवलं होते. कोरोना व्हायरसचा धोका असताना नवलखा तिहार जेलमध्ये आहेत. दरम्यान त्यांच्या वयाप्रमाणे कोव्हिड 19 चा धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी त्यांना ठेवणं सुरक्षित नाही. नवलखा यांनी मागील महिन्यात NIA कडे आत्मसर्मपण केले आहे. त्यानंतर मंगळवार (26 मे) दिवशी त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं.

गौतम नवलखा यांना मुंबई जवळ तळोजा येथील जेलमध्ये ठेवण्यात येईल. नवलखा यांच्यासोबत अन्य मानवाधिकार कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी नवलखा यांच्यावर 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषदेमध्ये भडखाऊ भाषण दिल्याने दुसर्‍या दिवशी भीमा कोरेगाव हिंसाचार झाल्याचा आरोप लावला आहे.