DCGI कडून आज (25 नोव्हेंबर) Bharat Biotech’s Intranasal अर्थात नाकावाटे दिल्या जाणार्या लसीच्या बुस्टर डोसला मर्यादित वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, DCGI ने यापूर्वीच लसीला 18 वर्षांवरील लोकांकरिता या लसीला Emergency Use Authorization साठी परवानगी दिली आहे.
फार्मा कंपनीने आपल्या पूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये दिलेल्या माहितीमध्ये iNCOVACC ही प्री-फ्यूजन स्टेबिलाइज्ड स्पाइक प्रोटीनसह रीकॉम्बीनंट रिप्लिकेशन-डेफिसिएंट एडिनोव्हायरस वेक्टरेड लस आहे. DCGI च्या विषय तज्ञ समिती (SEC) सदस्यांनी बूस्टर डोस - iNCOVACC (BBV154) वर चर्चा करण्यासाठी 15 नोव्हेंबर रोजी एक बैठक घेतली होती. हे देखील नक्की वाचा: राजकीय दबावामुळे कोविड-19 लस कोवॅक्सिन मंजूर करण्यात आली होती का? आरोग्य विभागाने सांगितले सत्य .
अहवालानुसार, कंपनीने सांगितले होते की iNCOVACC वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सेंट. लुईस, ज्याने रीकॉम्बीनंट एडेनोव्हायरल वेक्टर कंस्ट्रक्टची रचना आणि विकास केला होता आणि परिणामकारकतेसाठी प्रीक्लिनिकल स्टडीज मध्ये त्याची efficacy पाहिली आहे. दरम्यान, iNCOVACC ला व्हेरियंट-विशिष्ट लसींचा जलद विकास आणि सहज variant-specific vaccines करण्याचा दुहेरी फायदा आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊ शकते आणि चिंताजनक प्रकारांपासून संरक्षण होते.
कंपनीचा दावा आहे की ते Pandemics आणि Endemics दरम्यान मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा दावा करते. लस निर्मात्याने असेही सांगितले होते की iNCOVACC सहज स्टोरेज आणि वितरणासाठी 2-8°C तापमानावर स्थिर ठेवता येऊ शकणार आहे.