हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांना कोविड-19 (Covid-19) ची लागण झाली असल्याची माहिती काही वेळापूर्वीच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी अंबाला येथील हॉस्पिटलमध्ये Covaxin लसीचा डोस घेतला होता. त्यामुळे लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने सोशल मीडियात चर्चा रंगू लागल्या आहेत. तसंच लसीच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. यावर आता भारत बायोटेकने (Bharat Biotech) स्पष्टीकरण दिले आहे. (Anil Vij COVID 19 Positive: Covaxin लस घेतली तरीही Coronavirus पॉझिटीव्ह आले हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज)
भारत बायोटेकने स्पष्टीकरण देताना लिहिले की, "कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी Covaxin चे दोन डोस घ्यावे लागतात. एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लसीची क्षमता ठरवली जाईल. दोन्ही डोस घेतल्यानंतरच लसीचे परिणाम दिसून येतील." तसंच त्यांनी पुढे सांगितले की, "तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स हे मिश्र स्वरुपाचे आहे. ट्रायल्स मधील 50% स्वयंसेवकांना लस दिली असून 50% स्वयंसेवकांना placebo देण्यात आला आहे."
ANI Tweet:
The phase-3 trials are double-blinded and randomized, where 50% of subjects (participants in the trial) receive vaccine & 50% of subjects receive placebo: Bharat Biotech pic.twitter.com/Ask7G9w1Pm
— ANI (@ANI) December 5, 2020
यापूर्वी अनेक राजकीय नेते कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र लस घेऊनही कोरोनाचा संसर्ग झाल्याने लसीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (कोविड-19 वरील लसीला जानेवारी 2021 च्या सुरुवातीपर्यंत आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्यासाची शक्यता; Dr Randeep Guleria यांची दिलासादायक माहिती)
दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसींचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादमधील Zydus Biotech Park, हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) येथे भेट दिली होती. तसंच कोविड-19 वरील लसीसाठी अधिक काळ वाट पाहावी लागणार नसल्याची दिलासादायक माहिती काल त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली.