PM Narendra Modi| Photo credits: ANI Tweet

अमेरिकेची मॉर्डना आणि फायझर ही लस बाजारात येण्यासाठी सज्ज असताना आता भारतीयांना स्वदेशी कोरोना लसीची प्रतिक्षा आहे. आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी भारतातील कोविड 19 लसीकरणाबद्दल आढावा बैठक घेतली आहे. त्यावेळेस त्यांनी भारतीयांना मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. तज्ञांच्या मते, COVID-19 vaccine साठी फार वाट पहावी लागणार नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये ती तयार असेल. वैज्ञानिकांनी त्याला हिरवा कंदील देताच भारतामध्ये लसीकरणाला सुरूवात होईल अशी माहिती मोदींनी दिली आहे. COVID-19 Vaccine Update: कोविड-19 वरील लसीला जानेवारी 2021 च्या सुरुवातीपर्यंत आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्यासाची शक्यता; Dr Randeep Guleria यांची दिलासादायक माहिती.

दरम्यान कोरोना लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांशी लढणार्‍या वयोवृद्धांचा यामध्ये प्राधान्य असेल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. भारतीय संशोधकांना कोविड 19 लसीबद्दल आत्मविश्वास आहे. सध्या सार्‍या जगाचे भारताकडे लक्ष आहे. स्वस्त आणि सुरक्षित लस यांची ते वाट पाहत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांचं भारताकडे लक्ष असेल असेदेखील ते म्हणाले आहेत.

ANI Tweet

भारतामध्ये 3 स्वदेशी लसींच्या मानवी चाचण्यांचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्या सुरू असून त्या अंतिम टप्प्यांत आहेत. मागील आठवड्यात मोदींनी या तिन्ही लसींच्या निर्मितीमध्ये सहभागी असणार्‍या संस्थांना भेटी दिल्या आहेत. प्रामुख्याने पुण्यात सीरम इन्सिट्युट कोविशिल्ड, भारत बायोटेक आयसीएमआर सोबत कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिला ही फार्मा कंपनी देखील लस बनवण्याचं काम करत आहे.