Bharat Bhandh on September 27: शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक 25 सप्टेंबर ऐवजी 27 सप्टेंबर रोजी दिली आहे. महापंचायतच्या दरम्यान किसान मोर्चाने याबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. तसेच हे विधेयक सरकारने पाठी घ्यावे अशी ही मागणी केली जात आहे. जवळजवळ 9 महिन्यांपासून दिल्ली बॉर्डवर शेतकऱ्यांकडून हे आंदोलन केले जात असले तरीही त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही या निर्णयावर ठामपणे उभे आहेत.
किसान मोर्चान असे म्हटले की, येत्या 27 सप्टेंबरला भारत बंदच्या दरम्यान देशात सर्वकाही बंद असणार आहे. त्याचसोबत युपी संयुक्त किसान मोर्चाच्या गठनाची सुद्धा घोषणा केली आहे. रविवारी किसान महापंचायती दरम्यान शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन अन्य काही घोषणा सुद्धा केल्या आहेत. त्यांनी असे म्हटले की, जीव जाई पर्यंत आम्ही आंदोलनाच्या स्थळावरुन मागे हटणार नाही. आम्ही जो पर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्हाला कोणताही ताकद तेथून हटवू शकत नाही.(PM Narendra Modi बनले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते, तर मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष Andrés Manuel López Obrador दुसऱ्या स्थानी)
Tweet:
We take a pledge that we'll not leave the protest site there (at Delhi borders) even if our graveyard is made there. We will lay down our lives if needed, but will not leave the protest site until we emerge victorious: BKU (Arajnaitik) leader Rakesh Tikait at Kisan Mahapanchayat https://t.co/9v8dekM3vB pic.twitter.com/1pbp5ikQ8P
— ANI UP (@ANINewsUP) September 5, 2021
तसेच राकेत टिकैत यांनी पुढे असे म्हटले की, जेव्हा सरकार आम्हाला चर्चेसाठी बोलावेल तेव्हा आम्ही उपस्थितीत राहू. पण जो पर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. देशाच्या आजादीसाठी तर 90 वर्ष संघर्ष करण्यात आला होता. मात्र आम्ही सांगू शकत नाही की, आमचा संघर्ष किती दीर्घकाळ सुरु राहिल असे टिकैत यांनी म्हटले.