55 फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या 8 वर्षीय Tanmay Sahu ला 4 दिवसांनी मृतावस्थेत काढलं बाहेर काढण्यात आलं आहे. तन्मय संध्याकाळी 5 च्या सुमारास खेळता खेळता  बोअरवेल मध्ये पडला आणि त्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले  मात्र वेळेत मदत पोहचू न शकल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. बोअरवेलपासून सुमारे 30 फूट अंतरावर बुलडोझर व पोकलेन मशिनच्या साहाय्याने बोगदा काढण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. नक्की वाचा: Betul Borewell Rescue: मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)