Bengaluru Boyfriend Girlfriend and Crime News: बॉयफ्रेंड मानलेल्या मनुष्यावर ठेवलेला आंधळा विश्वास बंगळुरु येथील एक महिला आणि तिच्या कुटुंबाला तब्बल 2.5 कोटी रुपयांना पडला आहे. शहरातील 20 वर्षीय तरुणीचा प्रियकर म्हणून वावरत असलेल्या एका तरुणाने तिच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ (Intimate Video Blackmail) वापरुन तिच्या असहायतेचा फायदा (Blackmail Case) घेतला. तो इतक्यावरच थांबला नाही.. त्याने तिच्या कुटुंबाकडील आलिशान गाडी, दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन तब्बल अडिच कोटी रुपयांची फसवणूक (Financial Fraud) केली. पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर बंगळुरु पोलिसांनी (Bengaluru Police) गुन्हा दाखल केला आणि तपासानंतर आरोपीस अटक केली. मोहन कुमार असे आरोपीचे नाव आहे.
विश्वासाचे रूपांतर फसवणुकीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि कुमार यांची भेट त्यांच्या शाळेच्या झाली. मधल्या काळात ते परस्परांपासून दूर होते. मात्र, बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा एकदा एकत्र आले. त्यांच्या मैत्रीला पुन्हा पालवी फुटली. हीच मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि त्यांच्यातील जवळीक आणखीच वाढली. दोघांनीही आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. पण त्या घेत असताना पीडितेला कुमार याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ताही लागला नाही. परिणामी ती त्याच्यावर विश्वास ठेऊन मोकळी झाली. लवकरच कुमार याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला घेऊन तो फिरायला गेला. तिथे तिच्यासोबत खासगी क्षण साजरे केले. त्या क्षणांचे त्याने व्हिडिओ चित्रिकरणही केले. परस्परांसोबत गुप्तपणे साजरे केले जाणारे हे क्षण आपण खासगी आणि गोफनीय ठेऊ, तसेच केवळ आपल्या व्यक्तीगत आठवणी म्हणूनच वापरु असाही विश्वास त्याने दिला. पण पुढे पीडितेचा कपाळमोक्ष झाला. हे व्हिडिओ चित्रिकरण कुमार याने तिला ब्लॅकमेल करुन असाहयतेचा फायदा घेण्यासाठी केला. तिने पैसे आणि मौल्यवान वस्तू दिल्याशिवाय त्या ऑनलाइन लीक करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, Gujarat Shocker: इंस्टाग्रामवरील मित्राने न्यूड व्हिडिओद्वारे 13 वर्षीय मुलीला केले ब्लॅकमेल, 70,000 रुपयेही उकळले; पोलिसांकडून अटक)
महागडी घड्याळे, दागिने आणि एक लक्झरी कार गिफ्ट
आपले खासगी व्हिडिओ प्रसारीत होतील. त्यातून आपली आणि कुटुंबाची बदनमी होईल, या भीतीने पीडिता आरोपीच्या दबावात आली. त्यातून तिने आपल्या आजीच्या खात्यातून 1.25 कोटी रुपये काढले आणि कुमारने निर्दिष्ट केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केले. कालांतराने तिने त्याला 1.32 कोटी रोख, महागडी घड्याळे, दागिने आणि एक लक्झरी कार देखील दिली. कुमारने पुढे अनेक वेळा आपल्या वडिलांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी त्या महिलेशी हातमिळवणी केली. पण तो तिच्यावर दबाव टाकत राहिला. (हेही वाचा, Lucknow Shocker: बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून इयत्ता 8 वीतील मुलीची आत्महत्या)
सततच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे मागितली मदत
मोठ्या प्रमाणावर संपत्ती देऊनही कुमार याच्या मागण्या कायम राहिल्या. तो तिला धमकावत आणि लुबाडतच राहिला. त्यामुळे त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने बंगळुरु पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी कुमार यास अटक केली. बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी या गुन्ह्याचे वर्णन "सुनियोजित" असे केले. त्यांनी सांगितले की, कुमारने पीडितेकडून एकूण 2.57 कोटी रुपये वसूल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीकडून आतापर्यंत 80 लाख रुपये जप्त करण्यात यश मिळवले आहे. आरोपीने पुढे हस्तांतरीत केलेली संपत्ती आणि त्यांच्या प्राप्तकर्त्यांची ओळख पटविणे सुरु आहे. शिवाय, अधिक मालमत्ता वसूल करण्यासाठी तपास सुरू आहे.