बंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

घरातील वडिलधरी माणसे सध्या लहान मुलांना खेळण्यासाठी चक्क मोबाईल वापरण्यास देतात. त्यामुळे अवघ्या लहान वयातच मुलांना मोबाईलमधील काही गोष्टी माहिती पडतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र जर एखादी गोष्ट तुम्ही त्यामध्ये लपवून ठेवली असल्यास त्याचा एका वेगळ्याच पद्धतीने खुलासा झाल्यास तारांबळ उडते. अशाच पद्धतीचा प्रकार बंगळुरु (Bengaluru) येथे घडून आला असून वडिलांनी मुलाला मोबाईल खेळण्यासाठी दिला खरे पण त्यामधून चक्क बायको असूनही प्रेयसी सोबत संबंध असल्याचे बिंग फुटले आहे.

बाणाशंकरी येथे एक विवहित दापंत्यासह त्यांना एक मुलगा आहे. मुलाने गेम खेळण्यासाठी वडिलांकडे मोबाईल मागितला. त्यावेळी वडिलांना मुलगा फक्त गेम खेळण्यात व्यस्त राहिल अशा विचाराने निवांत झाले. परंतु मुलाने वडिलांचे विवाहबाह्य संबंध सुरु असल्याचा प्रकार त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगमधून शोधून काढला. तसेच प्रेयसीसोबत अश्लील पद्धतीमधील संभाषण सुद्धा झाले असल्याचे मुलाने पाहिले.(बंगळूरु येथे चिकनच्या नावाखाली कुत्र्याचे मांस विक्री? पोलिसांकडून तपास सुरु)

या प्रकाराची मुलाने माहिती आईला दिली असता तिने नवऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. यावर बायकोने नवऱ्याला जाब विचारला असता उलट त्याने तिला मारहाण केली. तसेच परिवारातील इतरांना याबद्दल सांगितल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. मात्र बायकोने पोलिसात धाव घेत नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.