Bengaluru Bomb Threat: ब्रॉडकॉम या पुट्टेनहळ्ळी, बेंगळुरू येथील खाजगी कंपनीला धमकीचा ईमेल आला होता. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कंपनीला हा ईमेल पाठवण्यात आला, त्यात बॉम्बस्फोटचा उल्लेख होता. धमकीचा ईमेल आल्यानंतर कंपनीने तत्काळ पुत्तेनहळ्ळीपोलिस स्टेशनला माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करत कंपनीच्या जागेची पाहणी केली. यावेळी तज्ज्ञांकडून तपासणी केली असता बॉम्बची धमकी देणारा हा ईमेल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या खोट्या धमकीमुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही, मात्र सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनी व आजूबाजूच्या परिसरात तपासणी करण्यात आली. हे देखील वाचा: Vile Parle Telecom Fraud: मुंबईतील विलेपार्ले येथे दूरसंचार फसवणूक; 75 वर्षीय नागरिकाने 8 लाख रुपये गमावले. हे देखील वाचा: Vile Parle Telecom Fraud: मुंबईतील विलेपार्ले येथे दूरसंचार फसवणूक; 75 वर्षीय नागरिकाने 8 लाख रुपये गमावले
या घटनेप्रकरणी पुत्तेनहळ्ळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी दक्षिण म्हणाले, "काल पहाटे 1 च्या सुमारास ब्रॉडकॉम या बहुराष्ट्रीय कंपनीकडे धमकीचा मेल आला होता. तज्ज्ञांनी पडताळणी केल्यावर ते बनावट असल्याचे आढळून आले. या संदर्भात पुट्टेनहळ्ळी पीएस येथे एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. ."
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या बनावट धमकीमागे असलेल्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. ब्रॉडकॉम कंपनी आणि तिच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.