
Baramati:कारमध्ये बसून दारुची पार्टी करणाऱ्यांना ही दारु पार्टी महागात पडली आहे. तर गुरुवारी रात्री या तिघांना कारमधून दारु पिताना असताना रंगेहाथ पकडले आहे.
बारामतीमध्ये गुरुवारी रात्री तीन मित्रांनी कारमध्ये दारु पार्टीचा बेत केला होता. तसेच दारु पिण्यासाठी व्यवस्थित तयारी करण्यात आली होती. मात्र दारु पिण्यास बसलेल्या कार शेजारी नुकतान पदभाकर स्वीकारलेले पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोंडसे उपस्थित झाले. गोंडसे यांनी कार मधील तीन मित्रांच्या दारु पार्टीचा बेत पाहून त्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्यावर बिगर परवाना दारु पित असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारमध्ये बसून दारु पिणे हे या तिन मित्रांना चांगलेच महागात पडले आहेत. तसेच प्रथमच उघड्यावर दारु पिणाऱ्यांवर कारवाई केली आहे.