द युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन (UFBU) या नऊ युनियनच्या अम्ब्रेला बॉडीने मंगळवारी 15 मार्च पासून 2 दिवसीय बंदची (Bank Strike) हाक दिली आहे. बॅंकांच्या खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात निषेध म्हणून आता हा 15,16 मार्च 2021 दिवशीचा बंद असेल. दरम्यान केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी बॅंकांच्या खाजगीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर बॅंक कर्मचार्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान काल हैदरामध्ये UFBUची एक बैठक झाली आणि त्यामध्ये सरकारच्या बॅंक खाजगीकरणाच्या निर्णयामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी असल्याची बाब पुढे आली आणि या निर्णयाचा निषेध म्हणून आता कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे 14,15 आणि 16 मार्च अशी सलग तीन दिवस बॅंक बंद राहिल्याने अनेकांच्या आर्थिक व्यवहारांचा खोळंबा होऊ शकतो.
सरकारने यापूर्वीच 2019 मध्ये आयडीबीआय बॅंकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात एलआयसी मध्ये घेतले आहेत. तर मागील 4 वर्षात 14 प्रायव्हेट सेक्टर बॅंकेचे खाजगीकरण झाले आहे. , All India Bank Employees Association (AIBEA) जनरल सेक्रेटरी C H Venkatachalam यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचार्यांचा बॅंकांच्या खाजगीकरणाला विरोध आहे.
UFBU मध्ये ऑल इंडिया बॅंक एम्पलॉयी असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉन्फडरेशन, नॅशनल कॉनफडरेशन ऑफ बॅंक एम्पलॉयी, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, बॅंक एम्पलॉयी कॉन्फ़डरेशन ऑफ़ इंडिया यांचा समावेश आहे.