Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

वर्षाच्या अखेरीच्या शेवटच्या महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या महिन्यात देशातील विविध ठिकाणी सणउत्सवांमुळे अधिक बँकांचे कामकाज 9 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुमची काही बँक संबंधित महत्वाची कामे असल्यात ती लवकरच आटोपून घ्या. कारण या सुट्टीच्या दिवसात तुम्हाला पैशांसबंधित काही अडचण आल्यास त्यासंबंधित मदत मिळू शकणार नाही आहे. या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच आज (1डिसेंबर) रविवार असल्याने बँक बंद आहे. त्याचसोबत डिसेंबर महिन्यात 8,15,22 आणि 29 डिसेंबरला रविवार आल्याने पुन्हा बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

तसेच 14 डिसेंबरला (दुसरा शनिवार) आणि 28 डिसेंबरला (चौथा शनिवार) असल्याने बँकेला सुट्टी आहे. खरंतर आरबीआयच्या मते महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार असल्याचे जाहीर केले आहे. याच कारणामुळे तुमचे काही बँक संबंधित काम असल्यास ते पूर्ण करा अन्यथा 25 डिसेंबरला ही सुट्टी आल्याने बँक बंद राहणार आहे. तर 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहे. पूर्वोत्तर काही राज्यात 24 आणि 26 डिसेंबरला बँकांचे कामकाज होणार नाही आहे. खरंतर पूर्वौत्तर राज्यात ख्रिसमसचा सण 3 दिवस साजरा केला जातो.(आजपासून 'या' नियमात मोठे बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान)

 तसेच 19 डिसेंबरला गोव्यात लिबरेशन डे साजरा करण्यात येणार असल्याने बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे नक्कीच जाणून घ्या. बँकांच्या सुट्टीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट द्या- https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx