Ayodhya Ram Mandir: राम मंदिर लवकरच बांधून पूर्ण होणार, मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची प्रसारमाध्यमांना माहिती
Ayodhya's Ram Mandir (Photo Credits: PTI)

अयोध्येमध्ये प्रभू श्री राम मंदिराचे ( Ayodhya Ram Mandir) बांधकाम नियोजित वेळेनुसार सुरु आहे. प्रामुख्याने मुख्य गाभारा आणि पाच मंडपांसह तीन मजल्यांचे मंदिर उभारण्याचे काम अयोध्येत वेगाने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव आणि श्री राम मंदिर बांधकाम समितीचे विद्यमान अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा (Nripendra Misra) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा यांनी म्हटले आहे की, मंदिराचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

मिश्रा यांनी म्हटले की, पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 हे आहे . ते पूर्ण झाले की आम्हाला गाभाऱ्यात प्रभू रामचंद्राची स्थापना करण्याची आपेक्षा आहे. त्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये ग्रॅनाइट दगडानेच प्लिंथचे बांधकाम फेब्रुवारी 2022 मध्येच सुरु झाले आहे. ते ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होईल. प्लिंथच्या बांधकामासाठी 5 फूट x 2.5 फूट x 3 फूट आकाराचे सुमारे 17,000 दगड वापरले जातील. जे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून उत्तम दर्जाचे दगड आणले जात आहेत. (हेही वाचा, Ram Mandir Construction: अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टला मिळाली सुमारे 100 कोटींची देणगी; 2024 पूर्वी पूर्ण होणार बांधकाम)

दुसऱ्या टप्प्यात तळमजला आणि पाच मंडपांचा समावेश आहे. हा टप्पा दोन मजल्यांचा आहे. तो डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण केला जाणे अपेक्षीत आहे. मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये राजस्थान बन्सी पहारपूर दगड कोरलेले असतील. ते कोरणे आगोदरच सुरु झाले आहे. तोपर्यंत 75,000 cft दगडी कोरीव काम पूर्ण झाले आहे. आता केवळ केवळ मंदिरातील सुपर स्ट्रक्चरसाठी सुमारे 4.45 लाख cft दगडांची आवश्यकता आहे. डिसेंबर 2025 पर्यंत, 71 एकरचा मंदिर परिसर पूर्ण होईल, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.