अयोद्धा (Ayodhya) येथील राम मंदिराचे (Ram Mandir) भूमिपूजन झाल्यानंतर देशभरातील भक्त श्रद्धेने काही ना काही भेट मंदिरासाठी पाठवत आहेत. दरम्यान, आज (बुधवार, 7 ऑक्टोबर) तामिळनाडू (Tamil Nadu) मधील रामेश्वरम (Rameswaram) येथून 613 किलो वजनाची भव्य घंटा भेट देण्यात आली. तब्बल 4500 किलोमीटरचा प्रवास करुन ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहचली. विशेष म्हणजे या घंटेचा नाद, ध्वनी अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू येणार आहे. या घंटेची उंची 4 फूट असून वजन 613 किलो आहे. याची रुंदी 39 फूट इतकी आहे. कांस्य धातूपासून बनवण्यात आलेली ही अनोखी घंटा आहे. ही खास घंटा तामिळनाडू येथील रहिवासी राजलक्ष्मी मांडा (Rajalakshmi Manda) यांनी राम मंदिरापर्यंत पोहचवली. रामरथावरुन ही घंटा अयोध्येत आणण्यात आली. 17 सप्टेंबर रोजी रामरथ यात्रा (Ram Rath Yatra) सुरु झाली होती. 21 दिवसांची ही यात्रा तब्बल 10 राज्यांतून प्रवास करुन 7 ऑक्टोबर रोजी अयोध्येत पोहचली. (श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी)
यात्रेदरम्यान जागोजागी या घंटेचे पूजन करण्यात आले. तसंच राम दरबार आणि गणेशाचीही पूजा करण्यात आली, असे राजलक्ष्मी यांनी सांगितले. यात्रेच्या माध्यमातून तामिळनाडू मधून एकूण 18 लोक अयोध्येत पोहचले. 'अयोध्येत येऊन मी धन्य झाले,' असे राजलक्ष्मी म्हणाल्या. 'बुलेट राणी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजलक्ष्मी यांनी 95 टन वजन खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा विश्वविक्रम करणारी ही दुसरी महिला ठरली आहे. (श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज!, See Pics)
यावेळी खासदार, आमदार, महापौर चंपत राय, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि बरेच लोक उपस्थित होते. बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमीपूजन झाले. त्यानंतर देशभरातून रामलल्लासाठी अनेक भेटी येत आहेत.