हनुमान जयंतीचे औचित्य साधून अयोध्येमध्ये राम मंदिर बनविण्यासाठी बनवलेले श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (Shri Ram Janmabhoomi Teertha Kshetra) ने आज आपला लोग प्रदर्शित केला. या लोगो मध्ये अयोध्येत बनविण्यात येणा-या श्रीराम मंदिराचे चित्र असेल. त्यासोबत प्रभू श्रीरामांसह पनवपुत्र हनुमानाचा फोटो देखील असेल. या लोगोत तुम्हाला सूर्यवंशी कुळातील असलेले रामांचे स्वरुप दर्शविण्यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाची सूर्यकिरणांसारखे चित्र आहे. हनुमान जयंतीनिमित्त अशा प्रकारचा लोगो प्रदर्शित होणे हे सर्व हनुमान भक्तांसाठी आनंदाची बाब आहे.
हा Logo तुम्ही नीट पाहिला असता यात सर्वात वर श्रीरामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र असे लिहिले आहे. ज्यामुळे तुम्हाला लोगो कशा संदर्भात आहे ते कळेल. याच्या दोन्ही बाजूस हनुमान वीरमुद्रेमध्ये विराजमान झालेले आहे. त्याच्या खालील बाजूस 'रामो विग्रहवान धर्म:' असे लिहिले आहे. अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट तर्फे आजपासून रामल्लाच्या ऑनलाईन दर्शनाला सुरुवात; फेसबुक, ट्विटर द्वारे घेता येणार लाईव्ह आरतीत सहभाग
हा लोगो लोकांसमोर आणताना महासचिव चंपत राय यांनी सांगितले आहे की या लोगोत धर्नुधारी प्रभू श्रीरामांचा फोटो मधोमध ठेवण्यात आला आहे. जे सर्व प्रकारे आपली रक्षा करतील.
केंद्र सरकारद्वारा बनविण्यात आलेल्या 'श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट' महंत नृत्य गोपाळदास यांना ट्रस्ट चे अध्यक्ष बनवले आहे. विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांना महासचिव तर गोविंद देव गिरी यांना कोषाध्यक्ष बनवले आहे. माजी कॅबिनेट सचिव नृपेंद्र मिश्रा यांना मंदिर निर्माण समिती चे चेअरमन पद दिले आहे.