Ayodhya Case | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

अयोध्या (Ayodhya) राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणात (Ayodhya dispute case) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मध्यस्थी समितीद्वारे सुनावणी होणार होती. मात्र आजची पहिली सुनावणी कोर्टाने टाळली असून आता ती तीन महिन्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मध्यस्थी समितीला 15 ऑगस्ट पर्यंतची वेळ देऊ केली आहे.

तर अयोध्या वादाप्रकरणी मध्यस्थी समितीने या प्रकरणी रंजन गोगोई यांच्यासह अन्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठापुढे अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र या प्रकरणी नेमकी कोणती पावले उचचली जात आहे हे पूर्णपणे गोपनीय असणार असल्याचे रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समितीने कोर्टात अहवाल सादर केला आहे.(आज सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समिती अहवाल करणार सादर)

निवृत्त न्यायमूर्ती एफएम खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असतील असे सांगितले होते. त्याचसोबत अध्यक्षांशिवाय अध्यात्मिक गुरु श्री श्री रिवशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचाही या त्रिसदस्यीय समितीत समावेश असणार आहे.तसेच 8 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले होते. त्याचसोबत अयोध्या वाद प्रकरणातील कोणताही माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये अशी तंबी समितीला दिली होती.