अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावनी पुढे ढकलली ( (Photo credits: PTI)

आयोध्या प्रकरणावर दाखल याचिकेवर सोमवारी (२९ ऑक्टोंबर) होणाऱ्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाकडून  स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या वर्षीच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी २०१९मध्ये होणार आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्यापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.दरम्यान,  या याचिकांवर आता थेट २०१९ मध्ये सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

उत्तर प्रदेशातील आयोध्या प्रकरणात श्री राम जन्म भूमी - बाबरी मशीद यांच्या २.७७ एकर जमीनवर मालकी हक्क नेमका कोणाचा? यावर निर्णय घेण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज (२९ ऑक्टोंबर) सर्वोच्च न्यायालयात सकाळी ११ वाजता सुनावणी होणार होती. त्यासाटी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचीही निर्मिती करण्यात आली होती. यात मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायाधीश एम जोसेफ यांचा समावेश होता. माजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्ययामूर्ती अशोख भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांनी या प्रकरणावर काम पाहिले होते. (हेही वाचा, राम मंदिर: अयोध्या जमीन प्रकरणावर आज सुनावणी; निर्णयाकडे देशाचे लक्ष)

दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त जमीन तीन भागांत विभागण्याच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी होणार होती. त्यानुसार सुनावणीस सुरुवातही झाली. मात्र, न्यायालयाने अवघ्या तीनच मिनीटात सुनावणीला स्थगिती दिली.