Ayodhya Case | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Ayodhya Case: देशातील एक संवेदनशील प्रकरण अशी ओळख असलेल्या अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिन वादावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (बुधवार, 10 जानेवारी) सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठासमोर (5-judge Constitution bench) होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या घटनापीठाचे अध्यक्ष आहेत. तर, न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड हे या घटनापीठाचे सदस्य. या प्रकरणावर 6 जानेवारीलाही सुरनावणी झाली होती. मात्र, अवघ्या अर्ध्या मिनिटांत आटोपलेल्या या सुनावणीदरम्यान, या प्रकरणाबाबत खंडपीठ तयार करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तयार करण्यात आलेले घटनापीठ हे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ज्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. २७ डिसेंबर 2018 रोजी २-१च्या बहुमताने सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने हे प्रकरण 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्यास नकार दिला होता. यासोबतच मशीद हा इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचेही म्हटले होते. (हेही वाचा, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 10 जानेवारी दिवशी, नव्या खंडपीठाची होणार निर्मिती)

अयोध्या येथे 2.77 एकर जमीन आहे. ही जमीनच रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाचे प्रमुख कारण आहे. या वादावर इलाहाबाद उच्च न्यायायालयाने यापूर्वी आपला निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात 14 याचिका दाखल झाल्या आहेत. याच याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर ०१०च्या २-१ च्या बहुमताने निर्णय दिला होता. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणाबाबतचा खटला 6 जानेवारीला सुनावणीसाठी कोर्टापुढे आला तेव्हा हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडेच असे कोणतेही संकेत मिळत नव्हते.