Australia Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team Dream11 Team Prediction: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 10 वा सामना ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ(AUSvsNZ) यांच्यात आज म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्वचषकातील (ICC Women's T20 World Cup)आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता.
अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आणि पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय नोंदविण्याकडे न्यूझीलंडचे लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
खेळपट्टीचा अहवाल
शारजाह क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. या मैदानावर फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना चेंडू स्पीन होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र फलंदाजांना फटकेबाजी करता येऊ शकते.
ऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला ड्रीम11 अंदाज: फलंदाज-बेथ मुनी ही अनुभवी फलंदाज आहे. जो न्यूझीलंडविरुद्ध मोठी खेळी खेळू शकते. बेथ मुनीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४३ धावा केल्या होत्या. याशिवाय ॲलिस पेरी आणि फोबी लिचफिल्डला संघात ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे ते ड्रीम11 संघासाठी चांगले पर्याय असतील. तर न्यूझीलंडकडून तुम्ही कर्णधार सुझी बेट्सला तुमच्या संघात ठेवू शकता. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुझी बेट्सने 27 धावा केल्या होत्या. मात्र, सुझी बेट्स ही अतिशय आक्रमक आणि अनुभवी फलंदाज आहे जी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी खेळू शकते. जॉर्जिया प्लिमर देखील एक चांगला पर्याय असेल.
ऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला ड्रीम11 अंदाज: यष्टीरक्षक-ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला तुम्ही यष्टीरक्षक म्हणून तुमच्या संघात ठेवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या ड्रीम 11 टीममध्ये न्यूझीलंडच्या इसाबेला गेजचाही समावेश करू शकता.
भारत विरुद्ध बांगलादेश ड्रीम11 भविष्यवाणी: अष्टपैलू आणि गोलंदाजांची निवड-दोन्ही संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेले आहेत. ऍशले गार्डनर एक चांगला पर्याय असेल. अनुभवी खेळाडू देखील आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेची 1 विकेट घेतली होती. याशिवाय सोफी डिव्हाईन ही अनुभवी अष्टपैलू खेळाडू असून अमेलिया केर हा एक चांगला पर्याय असेल. ताहलिया मॅकग्रा हा एक चांगला पर्याय असेल. याशिवाय मेगन शुट, जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिनक्स आणि इडन कार्सन यांचा समावेश करू शकता.
सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
यष्टिरक्षक: ॲलिसा हिली, याशिवाय इसाबेला गेजचाही पर्याय आहे.
फलंदाज: बेथ मुनी, एलिस पेरी आणि सुझी बेट्स.
अष्टपैलू: ऍशले गार्डनर, सोफी डिव्हाईन, अमेलिया केर (ताहलिया मॅकग्रा)
गोलंदाज: मेगन शुट, जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिनक्स आणि ईडन कार्सन. (जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि डार्सी ब्राउन)
कर्णधार आणि उपकर्णधार: ऍशले गार्डनर (कर्णधार), अमेलिया केर (उपकर्णधार).
दोन्ही संघांचे सर्वोत्तम ड्रीम 11
ऑस्ट्रेलिया महिला संघ: ॲलिसा हिली (विकेटकीपर/सी), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (सी), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन.