![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/95-119.jpg?width=380&height=214)
Atishay Nirlajja Kande Pohe Show Canceled: ) इंडियाज गॉट लेटेन्ट (India's Got Latent) या शोच्यामुळे सध्या वातावरण खुप तापले आहे. यामुळे सध्या असभ्य आणि अश्लील कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी ही केली जात आहे. यामुळे आता भाडीपा या यूट्यूब चॅनेलने त्यांच्या 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम देखील इंडियाज गॉट लेटेन्ट सारखाच असून यावेळी या कार्यक्रमात अभिनेत्री ताम्हणकर यांचे कांदेपोहेचा कार्यक्रम करणार होते. हा कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलण्यात आला आहे.
पाहा भारतीय डिजीटल पार्टीची फेसबुक पोस्ट -
'भाडिपाच्या Fans ना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या 'वातावरण तापल्यामुळे' 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज- कांदेपोहेचा शो आम्ही पोस्टपॉन करत आहोत. तसंही व्हॅलेन्टाईन्स डेला प्रोमोपेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेन्टला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे,' 'तिकिटांची रक्कम आगामी 15 दिवसांत तुमच्या बँक खात्यांवर जमा होईल रिफंडच्या पैशांतून स्वत:साठी काहीतरी छान गिफ्ट घ्या. आम्हाला माहिती आहे की आमच्या फॅन्सचंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाईलची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा एक्स्क्लुझीव्ह कॉन्टेट बघण्यासाठी खास यूट्यूब मेंबरशीप चालू केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदोपोहेचे सर्व व्हिडीओज 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच पाहायला उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनेलचा कंन्टेन्ट पाहू शकता,' असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय.