Assembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट
Shashi Tharoor (Photo Credits: Shashi Tharoor/ Facebook)

Assembly Elections Results 2018 :  मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana), छत्तीसगड (Chhattisgarh) , मिझोराम (Mizoram ) या राज्यंसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुक (Assembly Elections) निकालांचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. भाजप सरकारची बलंस्थान असलेल्या अनेक राज्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शशी थरूर यांनी ट्विट करताना अरूण जेटलींना खास मेंशन करून Great Day for India असे म्हटलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा पक्षावर खोचक टीका केली आहे. Assembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण

3 राज्यांमध्ये कॉंग्रेसच्या हातात सत्ता येण्याची चिन्ह असल्याने सध्या देशभरात कॉंग्रेस कार्यालय आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.

राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजप पराभवाच्या छायेत आहे. मिझोरममध्ये MNF ने बाजी मारली आहे. मिझोराममध्ये दहा वर्ष कॉंग्रेसची सत्ता होती. तेलंगणात टीआरएस आणि एमआयएमला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे.