Assembly Elections Results 2018 in Marathi: राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोरम (Mizoram) या पाच राज्यात सकाळीपासून सुरु झालेल्या मतमोजणीचे निकाल हाती आले असून यात भाजपला जबर धक्का बसला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे बहुमत सिद्ध झाले असून मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढाई सुरु आहे. काँग्रेसचे यश पाहता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय झालं?
मोदी जाने वाले है, राहुलजी आने वाले है अशा शब्दांत अशोकजींनी या निकालाचे वर्णन केले आहे. हा जनशक्तीचा विजय असून आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपचं घरवापसी निश्चित आहे. आणि काँग्रेस पुन्हा सत्ता येईल यात काही शंका नाही. मोदींच्या धनशक्ती ऐवजी जनशक्ती प्रभावी ठरली, असेही ते म्हणाले.
निवडणूकीचा हा निकाल म्हणजे हुकूमशाहीवर लोकशाहीचा, तिरस्कारवर प्रेमाचाआणि अहंकारावर नम्रतेचा विजय असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. काँग्रेसमुक्त भारत म्हणणारेच मुक्त होतील- अशोक गेहलोत
महाराष्ट्रात देखील फडणवीस सरकार काही महिन्यांपूरतं मर्यादीत राहील असून लवकरच राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी वर्तवला.