Assembly Elections 2023 Exit Poll Results: मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरामचे एक्झिट पोल निकाल पाहा एका क्लिकवर
(File Image)

Five State Assembly Elections Exit Poll Results Updates: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan ), तेलंगणा Telangana), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मिझोराम (Mizoram) या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक 2023 साठी मतदान पार पडले. या पाचही राज्यांमध्ये 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदान पार पडले असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी या मतदानानंतर विविध प्रसारमाध्यमे, संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज म्हणजेच एक्झीट पोल्स निकाल जाहीर झाले आहेत. या पाचही राज्यातील विधानसभा निवडणूक 2023 एक्झीट पोल्स निकाल (Assembly Elections 2023 Exit Poll Results) आपण येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. या राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरुद्ध कमलनाथ असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या राज्यातील मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल जाणून घेण्यासाठी खालील ट्विटरवर क्लिक करा.

एक्स पोस्ट

राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल

राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. या राज्यात काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष आहे. काँग्रेसची मदार मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यावर आहे. तर भाजपने वसुंधरा राजे शिंदे यांच्यासारखा प्रमुख चेहरा काहीसा बाजूला करुन इतर नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात याबाबत उतसुकता आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल जाणून घेण्यासाठी खालील ट्विटरवर क्लिक करा.

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे निकाल

तेलंगणा राज्यात के चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा BRS पक्ष सत्तेत आरे. या राज्यात बीआरएस विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळते आहे. बीआरएस यांना एकहाती सत्ता मिळेल असे वातावरण असताना काँग्रेसने प्रचारात अचानक मुसंडी मारली. ज्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी बीआरएस विजयाची हॅटट्रिक करणार की काँग्रेस सत्तेत येणार याबाबत उत्सुकता आहे. तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल पाहण्यासाठी खालील ट्विटरवर क्लिक करा.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे निकाल

एकूण 90 जागां असलेल्या छत्तीसगड विधानसभेसाठी 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन भागात मतदान पार पडले. या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसचे भूपेश बघेल आणि भाजपचे रमण सिंह हे आपापल्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. या राज्यातील एक्झिटपोल्सच्या अंदाजाबाबत उत्सुकता आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल पाहण्यासाठी खालील ट्विटवर क्लिक करा.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

मिझोराम विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल

मिझोराममध्ये विद्यमान मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM), काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मिझोराम विधानसभा निवडणूक 2023 एक्झिट पोलचे निकाल पाहण्यासाठी खालील ट्विटवर क्लिक करा.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरामचे एक्झिट पोल तेलंगणातील मतदानाच्या समाप्तीनंतर लवकरच जाहीर होत. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे जी के चंद्रशेकर राव यांना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवायचे आहे. मिझोराममध्ये, सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट राज्य राखण्याचा प्रयत्न करेल तर भाजप आणि काँग्रेस सत्तेत येण्यासाठी प्रयत्नकरत आहे. या मतदानाची मतमोजणी येत्या तीन डिसेंबर 2023 रोजी पार पडणार आहे.