Elections | (File Image)

इशान्य भारतातील तीन प्रमुख राज्ये असलेल्या त्रिपुरा (Tripura), नागालँड (Nagaland )आणि मेघालय (Meghalaya ) येथे पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2023) पार पडत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज (18 जानेवारी) तशी घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीलाला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्चला जाहीर होतील. उल्लेखनीय असे की, तीन राज्यांच्या विधानसभा प्रत्येकी 60 सदस्यांची संख्या आहे.

तिन्ही राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी CEC च्या वर्षातील पहिल्या पत्रकार बैठकीत सांगितले की, परीक्षांचा काळ लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 16 फेब्रुवारीला आणि नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निकाल 2 मार्चला जाहीर केला जाईल. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/india/news/legislative-assemblies-elections-2023-election-commission-of-india-eci-to-announce-the-schedule-of-for-nagaland-meghalaya-and-tripura-today-432814.html)

ट्विट

तिन्ही राज्यांच्या विधानसभेची मूतत मार्च 2023 मध्ये समाप्त

दरम्यान, नागालँड विधानसभेची मुदत 12 मार्च रोजी संपत आहे, तर मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेची मुदत अनुक्रमे 15 मार्च आणि 22 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये अधिसूचना जारी करण्याची तारीख 21 जानेवारी आहे आणि उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये, जानेवारी 31 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.