Election Commission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो COVID-19 Vaccine प्रमाणपत्रावरुन हटवा, निवडणूक आयोगाचे आदेश- मीडिया रिपोर्ट
PM Narendra Modi | (Photo Credits: YouTube)

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशा काळात निवडणूक आयोगाने (Election Commission ) कोरोना व्हायरस लस (COVID-19 Vaccine) घेतल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावरुन (COVID-19 Vaccine Certificates) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांची प्रतिमा हटविण्यास सांगितले आहे. अशा प्रकारचे फोटो प्रमाणपत्रावर छापने म्हणजे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे निरीक्षण नोंदवत निवडणूक आयोगाने हे आदेश दिल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मंतमा बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याकडे असलेल्या मंत्रालयाचा निवडणूक काळात प्रभाव टाकण्यासाठी सरळसर गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच, अशा प्रकारे प्रमाणपत्रावरुन फोटो हटविण्यात यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेत हे आदेश दिल्याचे समजते. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: अभिनेता Mithun Chakraborty पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता)

एनडीटीव्ही या व्हत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील निवडणूक आयोगाच्या एका उच्चाधिकार समितीने याबाबत अहवाल मागवला. या अहवालानंतर निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला अशा प्रकारे फोटो न वापरण्याबाबत आदेश दिले.

दरम्यान, कोरोना लसीकरणाऱ्या प्रमाणपत्रावर पश्चिम बंगाल आणि विधानसभा निवडणूक नसलेल्या इतर राज्यांमध्ये फोटो वापरला जाऊ शकतो, अशी मुभाही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 60 वर्षांवरली लोकांसाठी कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु होत आहे. ज्या लोकांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांच्यात कोरोनाची ठळक लक्षणं दिसत आहेत त्यांच्यासाठीही कोरोना लस टोचली जाणार आहे. मात्र, अशा लोकांना Covid shots नोंदणी करावी लागणार आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 27 मार्च पासून सुरुवात होत आहे. ही निवडणूक एकूण 8 टप्प्यांमध्ये पार पडत आहे. त्यासाठी 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल या दिवशी मतदान पार पडत आह. तामीळनाडू आणि केरळा येथे 6 एप्रिल या दिवश एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर त्याच दिवशी पुद्दुचेरी येथेही मतदान पार पडत आहे. असम राज्यात 27 मार्च, 1 आणि 6 एप्रिल या दिवशी मतदान पार पडत आहे.