विधानसभा निवडणूक 2018: राजस्थान-तेलंगणामध्ये मतदानाला सुरुवात; वसुंधरा राजेंनी केले मतदान
मतदानाचा हक्क बजावताना वसुंधरा राजे (Photo Credit: ANI)

विधानसभा निवडणूक 2018 : राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

राजस्थानमध्ये 15 व्या विधानसभा निवडणूकीसाठी एकूण 200 पैकी 199 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात एकूण 4,74,37,761 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. यामध्ये 2,47,22,365 पुरुष आणि 2,27,15,396 महिला मतदार आहेत. यापैकी युवा मतदारांची संख्या 20,20,156 आहे.

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी मतदानाचा हक्क बजावला.

तेलंगणामध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. फक्त काही ठराविक मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रीया संध्याकाळी 4 वाजता संपेल. तेलंगणात एकूण 2.80 कोटींहून अधिक मतदार आहेत. निवडणूकीसाठी एकूण 32,815 मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत.

तेलंगणाच्या उपमुख्यमंत्र्यांनीही केले मतदान.

राज्यस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील मतदान केले.

मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडण्यासाठी दोन्ही राज्यातील मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.