प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आसाम: एकीकडे दिल्लीतील निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी संपूर्ण देश झटत आहे, तर दुसरीकडे समाजातील बलात्काराची विकृती फोफावत आहे. नुकतेच बलात्काराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आसामच्या (Assam) विश्वनाथ जिल्ह्यात, एका 12 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार (Gangrape) आणि खून (Murder) केल्याप्रकरणी गेल्या रविवारी सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतीच दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यानंतर मुलीला झाडावर लटकून तिचा खून करण्यात आला. ही घटना गेल्या शुक्रवारी चाकला गावात घडली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घडणा घडल्यानंतर  हे सर्व आरोपी फरार होते, ज्यांना पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. हे सर्व आरोपी हायस्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचे विद्यार्थी होते. आरोपींनी परीक्षेनंतर मुलीला पार्टीसाठी घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होती. त्या रात्री ती सापडली नसल्याने, शनिवारी सकाळी कुटुंबियांनी एफआयआर दाखल केला.

त्यानंतरच्या तपासात मुलीवर बलात्कार करून खून झाल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, तिच्या घराजवळच झाडावर तिला फाशी देऊन खून करण्यात आला. त्यानंतर शनिवारी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींना पकडून याबाबत आयपीसी कलम 366 (ए), 376 डीबी, आयपीसी कलम आणि आर/डब्ल्यू कलम 34, पॉस्को कायद्याच्या कलम 4 ए अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे. कोल्हापूर: तरुणीवर सामूहिक बलात्कार; डोळ्यात स्प्रे मारून पीडितेचे अपहरण

ही घटना 2014 मध्ये बदायूंमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण करून देणारी आहे, ज्यात दोन मुलींचे मृतदेह झाडावर लटकलेले आढळले होते. त्या प्रकरणात सामुहिक बलात्कार व खुनाचा संशय व्यक्त केला गेला होता. मात्र, नंतरच्या तपासात सीबीआयने आपल्या अहवालात बलात्काराचा आरोप फेटाळून लावत आत्महत्या हे कारण लिहिले होते.