कोल्हापूर: तरुणीवर सामूहिक बलात्कार; डोळ्यात स्प्रे मारून पीडितेचे अपहरण
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कोल्हापूर (Kolhapur) येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. आरोपींनी सर्वप्रथम पीडित मुलीच्या डोळ्यात स्पे मारून तिचे अपहरण करुन शेतात घेऊन गेले. त्यानंतर संबंधित मुलीवर 3 वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातारण निर्माण झाले आहे.

आज नव्या वर्षाला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे. यातच कोल्हापूर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर 3 वेळा बलात्कार केल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आज दुपारी पीडित मुलगी रस्त्यावरुन जात असताना आरोपी सचिन शिंदे याच्यासह एका आरोपीने तिच्या डोळ्यात स्प्रे मारून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर 3 वेळा बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. विरोध करत असताना जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुलीच्या डोळ्यात स्प्रे मारून तिला मोटारसायकलवरून जबरदस्तीने पळवले आणि अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे. हे देखील वाचा- पुणे: पतीकडून पत्नीवर भररस्त्यात वार, मूल होत नसल्याच्या रागातून कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन शिंदे आणि अन्य एकाविरोधात पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या कसून तपास घेण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, पीडित तरुणीची सुरक्षेसाठी वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.