Arvind Kejriwal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अबकारी कर गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहे.  आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) बुधवारी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बुधवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) प्रमुखाने हायकोर्टात केलेल्या आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला होता की अटक आणि रिमांड आदेश दोन्ही बेकायदेशीर आहेत आणि त्याला ताबडतोब कोठडीतून सोडण्याचा अधिकार आहे. (हेही वाचा -INDIA Bloc Mega Rally: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 31 मार्च रोजी इंडिया ब्लॉकची मेगा रॅली, आप-काँग्रेसची घोषणा)

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना ईडी द्वारे अटक करण्यात आली होती. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने 22 मार्च रोजी सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली. पक्षाने प्रथम ईडी कोठडीत लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी 22 मार्च रोजी तपास संस्थेने केलेल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली.

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार, ते दररोज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान अर्धा तास पत्नी आणि स्वीय सहाय्यकाला भेटू शकतात, तर अर्धा तास त्याच्या वकिलांना भेटू शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार, ते दररोज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान अर्धा तास पत्नी आणि स्वीय सहाय्यकाला भेटू शकतात, तर अर्धा तास त्याच्या वकिलांना भेटू शकतात.