प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

घरातील मुलीचे लग्न म्हटले की आई-वडिलांना थोडे टेंन्शन येतेच. कारण लग्नातील खर्च प्रत्येक परिवाराला परवडेल असा नसतो. अशावेळी काहीजण कर्ज घेऊन आपल्या मुलीचे लग्न लावतात. याच पार्श्वभुमीवर सरकारकडून नववधूला लग्नात तिला 10 ग्रॅम सोने भेट म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. अरुंधती गोल्ड स्किम असे या योजनेचे नाव असून आसाम सरकारने ती सुरु केली आहे.(RTGS च्या सुविधेचा नागरिकांना आता 24 तास लाभ घेता येणार, पैसे ट्रान्सफर करण्यासंबंधित जाणून घ्या अधिक)

आसाम सरकारच्या अरुंधती गोल्ड स्किमच्या घोषणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामुळे मुलींच्या अधिकारासह त्यांच्या विकासाकरिता हातभार लागू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अर्ज करावा लागणार आहे. तर जाणून घ्या अरुंधती योजनेअंतर्गत या सुविधेचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा घेता येणार आहे.(7th Pay Commission: नव्या वर्षात 'या' सरकारी कर्मचा-यांना पगार आणि डीए मध्ये मिळणार घसघशीत वाढ)

- अरुंधती गोल्ड स्किम अंतर्गत अशा कुटुंबाला लाभ मिळणार आहे ज्यांना कमीतकमी दोन मुली आहेत.

-परंतु दोन पेक्षा अधिक मुली परिवारात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाही आहेत.

- अरुंधती गोल्ड स्किमनुसार विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षापेक्षा अधिक आणि मुलाचे 21 वर्षाहून असावे अशी अट आहे.

-तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आसाम सरकारच्या या अरुंथती गोल्ड स्किममुळे आर्थिक चणचण भासत असलेल्या परिवाराची मदत होणार आहे. तसेच सरकारकडून आधीच मुलींच्या शिक्षणासाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलींसह त्यांच्या आर्थिक परिवाला थोडा हातभार लागू शकतो.