अरूण जेटली पंचत्त्वात विलीन; निगम बोध घाट परिसरात शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप
Arun Jaitley (Photo Credits: Screengrab)

भारताचे माजी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते अरूण जेटली (Arun Jaitley) यांच्यावर आज (25 ऑगस्ट) दिल्ली येथील निगमबोध घाट (Nigambodh Ghat) परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अरूण जेटली 9 ऑगस्ट पासून दिल्लीच्या एम्स (AIIMS) रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान अरूण जेटली यांनी 24 ऑगस्ट दिवशी 12 वाजून 07 मिनिटांनी निधन झाले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर मुलगा रोहन याने पारंपारिक विधी पार पडल्यानंतर मुखाग्नी दिला. अरूण जेटली त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा व मुलगी आहे. अरूण जेटली यांची दोन्ही मुलं वकील आहेत. Arun Jaitley Funeral Live Update: अरुण जेटली यांना शासकीय इतमामात अंतिम मानवंदना

अरूण जेटली हे व्यवसायाने वकील होते. राजकारणात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभळले. भारताचे माजी अर्थमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नोटाबंदी, जीएसटी यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आले.

ANI Tweet

दरम्यान मागील काही महिन्यांपासून अरूण जेटली यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी मंत्रीपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौर्‍यावर आहेत. जेटली कुटुंबाने मोदींना त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून येऊ नका असे आवाहन केले होते. अरूण जेटली यांच्या निधनाने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी - उद्धव ठाकरे

अरूण जेटली यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक राजकीय नेत्यांनी आपले राजकीय दौरे रद्द केले. आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नेते नितीन गडकरी, पियुष गोयल पोहचले आहेत. यासोबतच राजनाथ सिंग, अमित शहा, डॉ. हर्षवर्धन, जे. पी. नड्डा देखील उपस्थित होते.