Artist Dies Of Heart Attack During Ramleela Performance: सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी रामलीलाचे (Ramleela) आयोजन केले जात आहे. शनिवारी रात्री दिल्लीतील शाहदरा येथे रामलीला सुरू असताना प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Artist Dies Of Heart Attack During Ramleela Performance) झाला. रामलीला सुरू असताना कलाकाराच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यामुळे तो छातीवर हात ठेवून स्टेजच्या मागे गेला. तेथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
सुशील कौशिक, असं या कलाकाराचं नाव होतं. सुशील हा व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर असून तो विश्वकर्मा नगर परिसरात राहत होता. 45 वर्षीय सुशील कौशिक हे प्रभू रामाचे भक्त होते. त्यांनी यापूर्वी देखील रामलीलामध्ये रामाची भूमिका साकारली होती. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची नेमकी तारीख अद्याप निश्चित सांगण्यात आलेली नाही. तथापि, या कार्यक्रमाच्या कथित व्हिडिओमध्ये कौशिक अचानक स्टेजवरून जाण्यापूर्वी, छातीवर हात ठेवून इतर कलाकारांसोबत परफॉर्म करताना आणि त्यांचे डायलॉग बोलताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने तो अचानक स्टेजच्या मागे जातो. (हेही वाचा - Young Girl Dies Of Heart Attack While Dancing: मेरठमध्ये हळदी समारंभात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणीचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ आला समोर)
दिल्लीतील रामलीला कार्यक्रमादरम्यान भगवान रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पहा व्हिडिओ -
#WATCH दिल्ली के शाहदरा इलाके में भगवान राम की भूमिका निभाते हुए शख्स को हार्ट अटैक आया। कलाकार की मौत हुई। pic.twitter.com/5OaYp7MEmZ
— NBT Hindi News (@NavbharatTimes) October 6, 2024
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुशीलला स्टेजवरच हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली. तथापी, सुशील यांच्या मृत्यूनंतर दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, ही एक सामान्य चर्चा आहे की, कोरोना लसीनंतर भारतात अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.